महाराष्ट्रातील मुंबई, पुणे सारख्या महानगरांमध्ये उद्योगांचे केंद्रीकरण झालेले आहे. त्यामुळे कोकणातील तसेच राज्यातील इतर भागातील तरुण रोजगारासाठी मुंबई, पुण्यात जातात आणि तिथेच स्थायिक होतात. म्हणूनच महाराष्ट्रातील मोठ्या शहरांमधील लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. जर उद्योगांचे विकेंद्रीकरण झाले आणि कोकणात नवनवीन औद्यगिक प्रकल्प उभे राहिले, तर कोकणवासीयांना आपल्याच गावात रोजगार मिळेल. मुंबई, पुण्याकडे जाणारा तरुणांचा लोंढा थांबेल आणि मोठ्या शहरांची लोकसंख्या देखील नियंत्रणात येईल.
0 Comments